॥ श्रीराम मंदिर वेबसाईट उद्घाटन सोहळा ॥

श्री. दीपकशेठ गद्रे - चेअरमन, गद्रे ग्रुप

आणि

सौ. उर्मिलाताई उल्हास घोसाळकर - अध्यक्षा, श्रीराम मंदिर संस्था, रत्नागिरी

यांच्या शुभहस्ते

दिनांक: २६ जानेवारी २०२६
वेळ: सायंकाळी ५.०० वाजता

00Days
00Hours
00Minutes
00Seconds

Website Developed By

Company Logo

१७ व्या शतकातील श्रीराम मंदिर देवस्थान, रत्नागिरी

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर हे एक पुरातन व जाज्वल्य देवस्थान म्हणून सुपरिचीत आहे. या देवस्थानची आजवर अनुभूती आल्याचे अनेक भाविक सांगतात, हे नवसाला पावणारे देवस्थान असल्याची सर्वांची श्रद्धा आहे.

रत्नागिरीतील श्रीराम मंदिर देवस्थान शिवकाळापासून असल्याचे जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख सापडतात. संस्थानच्या दफ्तरखान्यात असलेल्या मोडी लिपीतील कागदपत्रांमध्ये या देवस्थानचा उल्लेख आहे. शिवकालीन देवस्थानांना मराठशाहीतील संस्थानिकांचे आर्थिक पाठबळ होते. त्यानुसार बडोदे येथील संस्थानिक श्रीमंत गायकवाड महाराज यांचे या देवस्थानाला मागील काही वर्षांपर्यंत 'वर्षासन' मिळत असे. असे हे १७ व्या शतकातील म्हणजे सुमारे ३०० वर्षांचे पुरातन देवस्थान आहे. या देवस्थानचा प्रथम जिर्णोद्धार सन १९३६ मध्ये व दुसरा जिर्णोद्धार सन २०११ मध्ये संपन्न झाला.

देवस्थानातील प्रमुख उपक्रम

सामाजिक उपक्रम
धार्मिक उत्सव
रामाचा शिधा
साप्ताहिक अभिषेक

सुधारणावादी विचारांचे देवस्थान

हे श्रीराम मंदिर देवस्थान सुधारणावादी विचारांसाठी अग्रेसर देवस्थान म्हणून साऱ्या भारतात सुपरिचीत आहे. कालबाह्य झालेल्या अंधश्रद्धा दूर सारून या देवस्थानाने सदैव सुधारणावादी विचारांची कास धरली.

प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा चारही वेदांमध्ये "वेदोक्त" पद्धतीने.

सर्वधर्मियांनी श्रद्धेने आर्थिक सहाय्य दिले, ते स्वीकारण्यात आले.

सर्व मंदिरांचे भूमीपूजन विविध ज्ञाती बांधवांच्या हस्ते संपन्न झाले.

श्रद्धेने येणाऱ्या अन्य धर्मियांनाही मुक्त प्रवेश व कार्यक्रम.

भगिनींबाबत कालबाह्य अंधश्रद्धांना थारा नाही.

भाविकांना छायाचित्रे काढण्यास सदैव पूर्ण मुभा.

सर्व देवतांची स्वहस्ते पूजा सुविधा व पुरोहित सहाय्य.

'तुळजाभवानीचा गोंधळ' होतो तेव्हा भगिनींना हाती दिवटी धरण्याचा मान

देवस्थानात भगिनींसाठी 'श्रीराम महिला मंडळ' व 'तुळजाभवानी महिला भजन मंडळ' कार्यरत. भगिनींसाठी मार्गदर्शन व भजन-पूजा अनुभव मिळतो.

बातम्या

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या www.shrirammandirrtn.com वेबसाईटचा २६ जानेवारीच्या मुहूर्तावर कोकणचे सुपुत्र व ज्येष्ठ उद्योजक श्री. दिपकशेठ गद्रे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. दिपकशेठ गद्रे यांचा राम दरबारात दै. रत्नागिरी टाइम्सचे संपादक श्री. उल्हास घोसाळकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यावेळच्या छायाचित्रात त्यांचेसोबत ज्येष्ठ उद्योजक श्री. दिपक साळवी, ज्येष्ठ समाज नेते श्री. प्रसन्न आंबुलकर, श्री. सुधाकरराव सावंत व श्री. उपेंद्र सुर्वे पहिल्या छायाचित्रात दिसत असून दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित पदाधिकारी व मानकऱ्यांसह श्री. दिपकशेठ गद्रे. सोबत श्री. दिपकशेठ साळवी, श्री. प्रसन्नशेठ आंबुलकर, श्री. सुधाकरराव सावंत, श्री. संतोष रेडीज, श्री. राकेश चव्हाण, कु. समीक्षा सुनील नलावडे, श्री. सुनील नलावडे, श्री. संदीप डोंगरे, श्री. अण्णा लिमये, श्री. राजाराम सुर्वे, श्री. आंबवकर, श्री. उपेंद्र सुर्वे, श्री. दिपक राऊत, श्री. नित्यानंद दळवी, श्री. राजेंद्र नेरकर, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. दिपक देसाई, सौ. दया डावर, श्री. सुरेंद्र घुडे, श्री. गवंडे आदी मान्यवर.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा - play